Monday, 10 December 2018

हिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अधिवेशनाचा आज दुसरा दिवसही वादळी ठरला आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झालं मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला. गदारोळानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली आहे. 

दुष्काळ आणि आरक्षण या प्रश्नावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती असल्याचं दिसून येतयं. आजच्या दिवसभराच्या कामकाजात दोन्ही सभागृहात दुष्काळा संदर्भातील चर्चा केल्या जाणार आहेत.

त्याच बरोबर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अवनी वाघीनीची लक्षवेधीही विधासभेत सकाळच्या सत्रातच चर्चेला येणार आहे.

 महत्वाचं म्हणजे आरक्षणाच्या आणि दुष्काळाच्या मुद्यावरून संसदीय आयुधांचा वापर करीत विरोधक सरकारला घेरतील असेही चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य