Monday, 10 December 2018

मिकी माऊस झाला @90

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जगभरातील चिमुकल्यांचं लोकप्रिय कार्टून मिक्की माऊसचा आज 90 वा वाढदिवस आहे. कॉमिक्स आणि कार्टून सिनेमांसह अनेक वस्तूंच्या माध्यमातून मिकी माऊसनं चिमुकल्यांना वेड लावलं आहे. इतक्या वर्षांनंतर देखील मिकी अनेकांना भूरळ घालतोय. मिकीच्या 90 व्या वाढदिवसानिमित्तानं वॉल्ट डिजनीच्या वतीनं भव्य पार्टीचं आयोजन करण्यात येते.

व्यंगचित्रकार वॉल्ट डिस्ने यांची निर्मिती असलेला जगप्रसिद्ध मिकी माऊस ‘स्टीमबोट विली’ नावाच्या चित्रपटात पहिल्यांदा झळकला होता. त्या चित्रपटाचा प्रिमियर 18 नोव्हेंबर 1928 रोजी झाला होता. तीच मिकीची जन्मतारीख मानण्यात येते. मिकी हे अनेक अब्ज डॉलरच्या ब्रँडचे एक स्थायी प्रतीक आहे. 

micky2.jpg

मिकीच्या या वाढदिवसानिमित्त ‘मिकी 90 थ स्पेक्टॅकुलर’ हा चित्रपट या महिन्यात अमेरिकी वाहिन्यांवर झळकला होता.

 

mickey2.jpg

यात क्रिस्टन बेल आणि जॉन स्टॅमोस यांच्यासह अनेक नट-नट्यांनी सहभाग नोंदविला आहे. तसेच लेव्हीज, कॅम्पबेल सूप, पेझ, टार्गेट, गोल्डफीश आणि एव्हियन यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सनी यानिमित्त खास उत्पादने सादर केली आहेत.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य