Saturday, 15 December 2018

मीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला मीडिया आणि चाहत्यांशी संवाद साधताना जरा नम्रतेने वाग, अशी ताकीद BCCIच्या प्रशासकीय समितीने दिली आहे. विराट कोहलीने क्रिकेट चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्यानंतर CoA ने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून विराटला अशी ताकीद दिल्याचं समजतं. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून 21 नोव्हेंबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी समितीने विराटला ही ताकीद देण्यात आली आहे.

भारतीय फलंदाजीत विशेष काहीच नाही. त्यांच्यापेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अधिक चांगले खेळतात, असे एका चाहत्याने म्हटले होते. त्यावर विराटचा पारा चढला आणि त्याने क्रिकेट चाहत्याला थेट देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. परदेशी खेळाडू आवडत असतील, तर खुशाल देश सोडून जा, असे विराटने म्हटले होते.

त्यावर विराटला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. तसेच BCCIच्या प्रशासकीय समितीनेही विराटला धारेवर धरल्याचं समजतं. समितीतील सदस्यांनी विराटशी चर्चा केली असे सांगण्यात येत आहे. आक्रमकपणा खेळात असावा, पण मीडिया आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेने वाग, अशी ताकीद देण्यात आली आहे. भारतीय कर्णधारपदाला साजेसे असे वर्तन असायला हवे, असा सल्लाही समितीने विराटला दिला. त्यावर विराटने काय उत्तर दिले याबाबत हे समजू शकलेलं नाही. पण समितीने दिलेला हा सल्ला विराटने खूपच मनावर घेतल्याचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य