Monday, 10 December 2018

बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन आहे. 17 नोव्हेंबर 2012 ला बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाला आज 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. बाळासाहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी दादरच्या शिवतीर्थावर अनेक मान्यवरांसह शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.

बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून हिंदू, शिवसैनक आणि शिवसेना प्रेमी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर उपस्थित झाले आहेत. बाळासाहेबांचं मराठी माणसासाठी असलेलं योगदान हे कधीच न विसरण्यासारखं आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी आदरांजली वाहिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतिर्थावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवतिर्थावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शिवतिर्थावर फुलांची रांगोळी काढून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य