Monday, 10 December 2018

हेल्मेट नसल्याने पोलिसांनाही भरावा लागला दंड!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करत नाशिक ट्रॅफीक पोलिसानी लाखो रुपयांचा दंड आज वसूल केला आहे. नाशिक शहरातील 15 ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट ड्राईव्ह मोहीम घेण्यात आली ह्या मोहिमेत 300 हुन पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. मुख्यतः हेल्मेट नसणाऱ्यां वाहनधारकांकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आणि पैसे न भरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांची गाडी जप्त करण्यात आली.

दरम्यान ही कारवाई आज नाशिकच्या मुंबई नाका, पंचवटी, कॉलेज रोड, पंचवटी, नाशिक रोड,  सिडको, अंबड, म्हसरूळ, सातपूर, उपनगर आदी भागात करण्यात येऊन लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हेल्मेट नसल्यास 500 रुपये दंड दयावा लागत असल्याने अनेकांनी पोलिसांशी वाद घातला. मात्र ह्या मोहिमेत पोलिसांनी काही ही कारण न ऐकता वाहन दंड वसूल केला.

या कारवाई दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अनिता बागुल ह्यांना देखील ह्या कारवाईला समोर जावं लागलं हेल्मेट नसल्याने त्यांना पोलिसांनी अडवून त्यानां हेल्मेट बाबत विचारणा केली असता त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरवात केली.. “मला ओळखलं का?” असं म्हणत तुम्ही माझ्याकडून दंड कसा वसूल करता असं त्या म्हणाल्या. पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील वाद वाढेल म्हणून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र तुम्ही वाहतूक नियम मोडला असून तुम्हाला दंड भरावाच लागेल असं म्हटल्यावर मोठ्या अंतःकरणाने बागुल यांनी 500 रुपयांचा दंड भरला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य