Monday, 10 December 2018

तनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्यावर तनुश्री दत्ताने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. नाना पाटेकर आत्तापर्यंत सर्वांसमोर येऊन त्यांची बाजू स्पष्ट का करत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आता राज्य महिला आयोगासमोर झालेल्या चौकशीमध्ये नाना पाटेकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी महिला आयोगासमोर नाना पाटेकर यांची सुनावणी झाली. त्यावेळी नाना पाटेकर यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली. काही महिन्यांपूर्वी #MeToo मोहिमेअंतर्गत तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. त्या प्रकरणावरून बॉलिवुडमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.

नेमकं प्रकरण काय होतं ?

2008 साली हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. नाना पाटेकरांनी डान्स करताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा दावाही तनुश्री दत्ताने केला होता. या आरोपांनंतर बॉलिवुडमध्ये एक वेगळचं वातावरण निर्माण झालं होत.

तनुश्रीनंतर अनेक अभिनेत्रींनी #MeToo या मोहिमेअंतर्गत आपल्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. यामध्ये बॉलिवुडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली होती. यामध्ये संस्कारी बाबू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलोक नाथ यांच्यापासून साजिद खान, अनु मलिक, विकास बेहेल यांची नावे समोर आली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य