Sunday, 20 January 2019

रावण दहनावेळी अमृतसरमध्ये रेल्वे अपघात, ट्रेनखाली चिरडून 50 पेक्षा जास्त मृत्युमुखी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पंजाबच्या अमृतसरमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला. रेल्वे अपघातामध्ये 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

ही दुर्घटना अमृतसर आणि मनावला दरम्यान फाटक क्रमांक 27 जवळ झालीये. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा शेजारी असलेल्या मैदानात रावण दहनाचा कार्यक्रम सुरु होता.

रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. यावेळी डीएमयू ट्रेन क्रं 74943 त्या ठिकाणाहून जात होती.

रावण दहन सुरु असताना फटाक्यांच्या आवाजात लोकांना ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला नाही त्यामुळे एवढा मोठा अपघात घडला. इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर पंजाब सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

या कार्यक्रमात पर्यटनमंत्री सिद्धू आणि त्यांची पत्नी उपस्थित होते. 

  • घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी, रुग्णवाहिका पोहोचल्यात
  • आतापर्यंत 50 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती
  • बचाव कार्य सुरु आहे.
  • जखमींना रुग्णालयात घेवून जाण्याच काम सुरु
  • रेल्वे पठानकोटपासून अमृतसरसला जात होती
  • आतापर्यंत 30 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यु होण्याची शक्यता 
  • रेल्वे रुळावर लोक रावणचा पुतळा जळत पाहत असताना ही घटना घडली. 
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य