Tuesday, 13 November 2018

शिर्डीनंतर पंतप्रधान मोदींची 'इथेही' भेट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट शिर्डी येथून अमरावती जिल्ह्यातील 24 महिलांशी संवाद साधला. यामध्ये जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील फतिमा बी अब्दुल सलीम यांच्याशी थेट संवाद साधून त्यांना मिळालेल्या पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभाविषयी विचारणा केली. यावेळी फतिमा बी यांनी आपल्या पुर्वी घराची परिस्थिती आणि आता या योजनेमुळे मिळालेलं हक्काचं पक्कं घर याबाबत मोदींसमोर आनंद व्यक्त केला.

अमरावतीवरून अगदी 15 किमी.अंतरावर सात हजार लोकसंख्या असलेलं अंजनगाव बारी गाव...

या गावामध्ये पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत 189 घराच्या कामाला मंजुरी मिळाली असून आज 111 कामे पूर्ण झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फतिमा बी अब्दुल सलीम यांनी संवाद साधल्याने गावामध्ये एकंदरित आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

अमरावती जिल्ह्याला पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत 33 हजार घरकुलचे टार्गेट होते यापैकी 30,500 घरकुल पूर्ण झाले असून अमरावतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खात्री यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य