Thursday, 13 December 2018

गंगेच्या स्वच्छतेसाठी उपोषण करणाऱ्या 'त्यांचा' अखेर मृत्यू!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

गंगा नदीच्या स्वच्छतेसंदर्भात कायदा करण्यात यावा, यासाठी आमरण उपोषणाला बसलेलेल जी.डी. अग्रवाल यांचे निधन झाले आहे.

गंगेचे पावित्र्य राखले जावे आणि तिची निर्मळता कायम राखण्यासाठी संसदेत खास कायदा व्हावा या मागणीसाठी जी डी अग्रवाल हे गेल्या २२ जून तारखे पासून गंगेचा कायदा पास व्हावा या साठी दिल्ली मध्ये उपोषणाला बसले होते. बुधवारी खासदार रमेश पोखरियाल यांच्या सोबतची त्यांची बैठक विफल ठरल्यानंतर त्यांनी पाण्याचाही त्याग केला. त्यानंतर अग्रवाल यांची तब्येत खालावल्याने त्यांना पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल केलं होते. एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच अशक्तपणा आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचं वृत्त आहे.

आयआयटी कानपुर मध्ये प्रोफेसर म्हणून त्यांनी कामाची सुरवात केली होती.

जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ म्हणून त्यांची देशभरात ओळख होती.

इंडियन सेंट्रल पोल्यूशन बोर्डचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम माहिलं होतं.

अग्रवाल यांनी संन्यास घेऊन स्वामी ज्ञानस्वरूप सानंद हे नाव धारण केलं होतं.

गंगा नदीच्या स्वच्छतेसंदर्भात कायदा व्हावा, यासाठी गेल्या 112 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं.

त्यांच्या निधनाने देशभरातील पर्यावरप्रेमीं मध्ये शोककळा परसरली आहे. ऋषिकेशच्या ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’ला त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे शरीरदान करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य