Thursday, 13 December 2018

पुन्हा चंद्रामध्ये साई, अफवा की आणखी काही?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

शिर्डीच्या साईबाबांबद्दल सोशल मीडियावर नेहमीच अफवा पसरत असतात. आता अफवा ही चक्क चंद्र आणि साईबाबा यांच्याशी संबंधित आहे.

सुर्यालाही आग आहे, चंद्रालाही डाग आहे, ही म्हण तुम्ही नक्कीच वाचली किंवा ऐकली असेल. मात्र, आता तर चक्क पौर्णिमेच्या चंद्रावर साईबाबांची प्रतिमा दिसते आहे. 

कधी कोणी काय अफवा पसरवतील याचा काही नेम नाही.असंच काहीसं मुंबईत घडलं. पौर्णिमेच्या चंद्रावर साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा सोमवारी रात्री मुंबईत पसरवण्यात आली. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणच्या मैदानांवर चंद्र दर्शनासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

सोमवारच्या भाद्रपद पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चंद्राचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये चंद्रावर साईबाबांची प्रतिमा दिसत होती.

खऱ्या भक्तांनाच फक्त रात्री चंद्रावर साईबाबांचा चेहरा दिसेल असा मॅसेजही व्हायरल झाला. त्यामुळे अनेक लोक साईबाबांचा चेहरा चंद्रावर दिसतो का हे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले. 

ही अफवा फक्त मुंबईतच नाही तर कोकणातही रत्नागिरी, रायगड परिसरात काही प्रमाणात पसरली. सोशल मीडियावर ही अफवा जंगलाला आग लागल्यासारखी पसरत आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य