Thursday, 13 December 2018

असे आहे मुंबईतल्या गणपती विसर्जनाचं नियोजन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

उद्या अनंत चतुर्दशी...गेल्या 10 दिवसांपासून मुक्कामी असलेले लाडके बाप्पा आता आपल्या गावाला निघणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वचजण सज्ज झाले आहे.

खास करून मुंबई,पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये बाप्पाच्या विसर्जनासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. उद्या हा लाडका बाप्पा वाजतगाजत सर्वांचा निरोप घेणार आहे. या निरोप प्रसंगी कोणतेही विघ्न घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

मुंबईतील विविध चौपाट्यांवर उसळणारी गर्दी पाहता घातपात घडू नये किंवा कायदा व सुव्यस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई पोलिसांचे पन्नास हजार अधिकारी आणि कर्मचारी रविवारी बंदोबस्ताला तैनात असतील. लालबागचा राजा आणि अशाच मोठ-मोठ्या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन पाहायचे असेल तर तुम्ही गिरगाव चौपाटी गाठू शकता. 

अशी आहे मुंबईत व्यवस्था

 • पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून लाइव्ह मॉनिटरिंग
 • गर्दीची ड्रोनद्वारेही होणार टेहाळणी
 • होमगार्ड, स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेणार
 • महिला, मुलांसाठी विशेष पथक
 • सोशल मीडियावर नजर
 • लालबागच्या राजासाठी खास बंदोबस्त
 • लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनमधून नजर

मुंबई : गणेश विसर्जन ठिकाण

 • गिरगाव चौपाटी
 • शिवाजी पार्क, दादर 
 • जुहू बीच, सांताक्रुझ
 • वर्साेवा बीच, अंधेरी
 • भुजाळे तलाव, मालाड पश्चिम
 • अक्सा बीच, मालाड पश्चिम
 • गोराई बीच, बोरिवली पश्चिम
 • शीतल तलाव, कुर्ला पश्चिम
 • पवई तलाव, पवार वाडी

विसर्जनासाठी मुंबई सज्ज

 • शहरात विसर्जनासाठी 162 केंद्र सज्ज
 • विसर्जनाच्या ठिकाणी प्राथमिक उपचार केंद्र
 • परदेशी पर्यटकांसाठी विसर्जन पाहण्यासाठी विशेष सोय
 • समुद्रकिनाऱ्यावर कोस्ट गार्ड , लाईफगार्ड आणि नेव्ही सज्ज
 • बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकांच्या मदतीनं विसर्जन स्थळांची होणार तपासणी
 • महिला, मुलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची विशेष पथक
 • छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेषात पोलीस गस्त घालणार
 • पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पोलिसांची बारीक नजर
 • गर्दीची ड्रोनद्वारेही होणार टेहळणी
 • विसर्जनासाठी 50 हजार पोलीस तैनात
 • SRPF, रॅपीड अॅक्शन फोर्स, फोर्स वन आणि होम गार्डचे जवान तैनात


विसर्जनासाठी ट्राफिकच्या उपाययोजना

 • ट्राफिक संचलनासाठी 3,200 ट्राफिक पोलीस रस्त्यावर तर 1600 ट्राफिक वॉर्डनची मदत
 • रविवारी मुंबईतील 53 रोड वाहतुकीसाठी बंद
 • 56 रस्त्यांवर एकतर्फी वाहतूक
 • 18 रोडवर जड वाहनांना बंदी
 • विसर्जन क्षेत्रातल्या 99 जागेवर पार्किंगला बंदी

 

मध्य मुंबई मार्ग

लोअर परेल ब्रिज बंद झाल्यामुळे मध्य मुंबई सर्वात वाईट प्रभावित होईल, कारण अनेक मंडळाला एलफिस्टन आणि महालक्ष्मी मार्गाचा पर्याय घ्यावा लागला आहे.

डेलिसली पुल तोडल्यामुळे परेल, लालबाग, शिवरी, चिंचपोकळी आणि लोअर परेल परिसरातील 40 प्रमुख मंडळाला अतिरिक्त तीन किलोमीटर प्रवास करावा लागेल, आधीच गर्दी असलेल्या महालक्ष्मी आणि सात रस्ता परिसरात जर प्रवाश्यांनी एलफिन्स्टन पुलाचा मार्ग घेतला तर एकेरी वाहतूकीला अधिक त्रास होईल.

 

पश्चिम मुंबई मार्ग

मेट्रोच्या कामकाजामुळे आणि गणपती विसर्जनामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावर ट्रफिक लागणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य