Wednesday, 12 December 2018

गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या 'झी युवा'च्या कलाकारांवर विघ्न...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

गणेशोत्सवात नावाजलेल्या गणपती मंडळांत सिनेकलाकारही दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र गर्दी वाढते ती त्या कलाकारांच्या चाहत्यांनी...

अशाच कोल्हापूरातल्या राजारामपुरी दहाव्या गल्लीतील इंद्रप्रस्थ तरुण मंडळात झी युवाच्या 'फुलपाखरू' मालिकेतील मानस वैदेही म्हणजेच ऋता दुर्गुळे व यशोमान आपटे यांच्यासह 'आम्ही दोघी' मालिकेतील आदित्य आणि मीरा म्हणजेच विवेक सांगळे आणि खुशबू तावडे गणपती मंडळांना भेट देण्यासाठी आले होते.

या मंडळात मालिकेतल्या कलाकारांनी उपस्थिती लावल्याने त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. त्यावेळी कलाकारांना गणरायाची आरती केली.  रात्री १० च्या दरम्यान आरती संपन्न होताच देखावे पाहण्यासाठी आलेले नागरिक कलाकारांसोबत सेल्फी काढण्यासाठी स्टेजवर आले. स्टेजची क्षमता ५०० लोकांपर्यंत होती. पण अचानक १५०० हून अधिक लोक स्टेजवर आल्याने स्टेजला सपोर्ट दिलेली लोखंडी पाईप तुटली. यामुळे स्टेजचा काहीभाग कोसळला.मंडळातील कार्यकर्त्यांनी तत्काळ सर्वांना सुखरूप बाहेर काढले. स्टेजची उंची कमी असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. यामध्ये 'झी युवा'च्या कलाकारांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

यावेळी अचानक स्टेज कोसळल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ स्टेज दुरुस्तीचे काम हाती घेतले असून पुन्हा गणेशभक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. राजरामपुरीमध्ये दरवर्षी विविध मंदिर आणि वास्तूंच्या प्रतिकृती साकारल्या जातात. यावर्षीही सर्वत्र आकर्षक मंदिरांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. १० व्या गल्लीतील इंद्रप्रस्थ तरुण मंडळाने सुद्धा यावर्षी 'गोल्डन पॅलेस'चा सेट उभा केला आहे. 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य