Thursday, 13 December 2018

दु:खाचा दिवस 'मोहरम'...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मोहरम किंवा मुह्हरम हा एक मुस्लिम सण आहे. इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. मोहरम याचा अर्थ "निषिद्ध, धिक्कार करण्यासारखा" असा आहे.

मोहरम कधी आहे?

यावेळी मोहरमचा महिना 11 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर आहे. पण 10 व्या मुहर्रम सर्वात खास आहे. 10 व्या मोहरमच्या दिवशी हजरत इमाम हुसेन याने इस्लामचे संरक्षण करण्यासाठी आपले जीवन सोडून दिले. मोहरम इस्लामिक कॅलेंडरचा महिना आहे, परंतु सामान्यत: लोक 10 व्या मुहर्रमला सर्वात जास्त देतात. यावेळी 10 वी मोहरम 21 सप्टेंबरला आहे.

मोहरमचा इतिहास -

हिजरी संवत या पहिल्या महिन्यात मोहरमची 1 तारखेला (1 मुहर्रम 61 हिजरी, अर्थात 1 ऑक्टोबर 68) मोहम्मद साहेब यांचे नातू हजरत हुसैनयांना करबला येथे खलिफा यजीद बिन मुआविया या साथीदाराने या दिवशी मारून टाकले होते, तो दिवस म्हणजे 'यौमे आशुरा' होय. याच दिवशी दुखाचा दिवस म्हणून मुस्लिम बांधव मोहरम साजरा करतात. 

पैगंबर म्हणजे इस्लामचा 'पैगाम 'म्हणजे संदेश माणसापर्यंत पोचवणारे आदरणीय प्रेषित. पैगंबर यांनी हा धर्म निर्माण केला. त्यांना या धर्माचा 'इलहाम' झाला. त्यांना जेव्हा याचा 'इलहाम' झाला म्हणजे दृष्टांत झाला त्यावेळेस त्यांना आपण काय बोलत आहोत, कुठे आहोत याची जाणीव उरलेली नव्हती. त्या दिवसापासून यांना, "सल्लील्लाहू अलेह वसल्लम हजरत पैगंबर नबी" अशी ओळख मिळाली. सुरवातीस हा युद्ध व रक्तपातास निषिद्ध महिना होता. हा महिना पवित्र होता, परंतु इमाम हुसेन यांच्या वधाची घटना याच महिन्यात घडली म्हणून हा महिना अशुभ ठरला. हजरत पैगंबर नबी साहेबांचे मुलीकडून नातू असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी इ.स. सातव्या शतकात करबला मैदानात "दर्दनाक मौत" करत ठार मारले.

हा ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. या ताबुताचे तोंड मक्केकडे यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात. हुसेन यांचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेन यांच्या नातेवाईकांना पाणीही मिळू दिले नाही, म्हणून आज थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त भारत, पर्शिया व इजिप्तमध्ये पाळतात. हा प्रकार अरबस्तानात पाळत नाहीत. ते हा प्रकार अधार्मिक मानतात. कट्टर मुसलमान ताबूत हा मुर्तीपुजेचा प्रकार म्हणून निषिद्ध मानतो. शेवटच्या दिवशी एका लाठीला 'पंजा' लावून चांगले वस्त्र बांधतात.

loading...

Top 10 News

राशी भविष्य