Thursday, 13 December 2018

केबिन क्रूची ही चुकी, विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जेट एअरवेजमधील केबिन क्रूच्या एका चुकीमुळे विमानातील शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता..केबिन क्रू विमानातील हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच ऑन करण्यास विसरले. त्यामुळे विमानातील हवेचा दाब वाढला आणि प्रवाशांच्या कान आणि नाकातून रक्त वाहू लागल्याने एकच घबराट पसरली. त्यामुळे विमानाचं ताबडतोब मुंबई विमानतळावर पुन्हा लँडिंग करण्यात आलं.

मुंबई विमानतळाहून जेट एअरवेजच्या मुंबई-जयपूर विमानाने उड्डाण घेतलं होतं. टेकऑफच्या वेळी विमानातील हवेचा दाब नियंत्रित करणारं बटन स्वीच ऑन करण्यास केबिन क्रू विसरले, त्यामुळे विमानातील प्रवाशांच्या नाका-तोंडातून रक्त वाहू लागले. काही लोकांना डोकेदुखीचा त्रास झाला. तर काहींना मळमळ होऊ लागली.

हा प्रकार अचानक सुरू झाल्याने विमानात एकच घबराट पसरली. त्यामुळे हे विमान पुन्हा माघारी वळवण्यात आलं आणि मुंबई विमानतळावर त्याचं लँडिंग करण्यात आलं.

त्यानंतर या प्रवाशांना विमानतळावरील दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य