Thursday, 13 December 2018

राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदी, शहांवर निशाणा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्राद्वारे मोदी आणि शहांवर टीका केली आहे.

राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रात एका ठिकाणी मोहन भागवत आणि स्वयंसेवक दाखवलेत. मोहन भागवत यांनी दिल्लीतील भाषणात लोकशाहीबाबत केलेल्या मुद्द्यावरून व्यंगचित्राच्या माध्यमातून काही खोचक प्रश्न उपस्थित केलेत. मोहनजी तुम्ही बरोबर सांगत आहात, आपण म्हणताय तेच आजपर्यंत आम्हाला शिकवलं गेलं पण या दोघांना ते शिकवलं गेल नाही का ?, असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी मोदी आणि शहांवर निशाणा साधला आहे.

तसंच आरएसएस ही संघटना लोकशाहीप्रधान संघटना आहे, असं म्हंटलं तर दुसरीकडे त्यांनी मोदी आणि शहा यांना वर्गा बाहेरचे विद्यार्थी म्हणत व्यवस्थेचे हाल कसे केलेत ते दाखवलं आहे.

काल झालेल्या मोहन भागवत यांच्या दिल्लीतील भाषणानंतर व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे.

मोदी आहेत 'प्रसिद्धी विनायक' - राज ठाकरे

loading...

Top 10 News

राशी भविष्य