Thursday, 13 December 2018

कराडमधील या गणेश मंडळाचा अनोखा समाजपयोगी उपक्रम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

गणेशोत्सव जवळ आला की गणेशोत्सव कसा साजरा करावा?डॉल्बीगुलाल पाहिजे का नकोअशा अनेक गोष्टींवर चर्चा होते.

अनेकदा सगळीकडे गणेशोत्सव मंडळांमध्ये सुरु असणाऱ्या हिडीस प्रकाराचीच चर्चा होते, मात्र काही गणेशोत्सव मंडळे खुप चांगलं काम करुन समाजाला आदर्श देत असतात.

कराड तालुक्यामधील उंडाळे गावातील नवयुवक गणेश मंडळाने असाचं आदर्श तयार केला आहे.

या गावातील कुणाचाही मृत्यू झाला तर अंत्यविधीचा सगळा खर्च हे मंडळ उचलते.

येथील गणेश मंडळाच्या या अनोख्या उपक्रमामुळे गोरगरीबांना संकटकाळी आधार मिळतो.

नवयुवक गणेश मंडळाचा उपक्रम

 • कराड तालुक्यातील उंडाळे या गावातील नवयुवक गणेश मंडळ गावातील कुणाचाही मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधीचा सगळा खर्च करत आहे.
 • 3 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात 2 वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे.
 • ग्रामीण भागात एखाद्या कुटूंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी 5 हजाराच्या वर खर्च येतो, अगोदरच दवाखाने आणि औषधांवर झालेल्या खर्चामुळे कुटूंबासमोर आणखी मोठ संकट कोसळतं.
 • अशा सर्व परिस्थितीचा विचार करुन नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अंत्यविधीचा खर्च उचलला आहे.
 • याच बरोबर रक्षाविसर्जन च्या वेळेस कुटुंबातील व्यक्तीकडून स्मशानभूमीत झाड लावले जाते, आणि त्याला झाडाच्या भवती मृतदेहाची राख वापरली जाते.
 • त्यामुळे लावलेले झाड जगविण्याची भावनिक व नैतिक जबाबदारी त्या कुटुंबियावर येते.
 • या उपक्रमामुळे 4 वर्षात स्मशानभुमित मोठी वनराई निर्माण झाली आहे. अशा उपक्रमामुळे अनेकांना आधार मिळाला आहे.
 • या लहान गावातील मंडळाने आतापर्यंत रक्तदान शिबिर, सभासद विमा, गुणवंताचा सत्कार व्याख्याने असे उपक्रम राबवले.
 • अंत्यविधीच्या खर्चाच्या उपक्रमाबरोबरच श्रंद्धाजंली कॉर्नर ही करण्यात अला आहे. गावातील मुख्य चौकात निधन झालेल्याचे डिजिटल बॅनर लावून त्यावर रक्षा विसर्जन आणि इतर विधींची माहिती दिली जाते.
 • गावातील गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांचेच प्लेक्स लावून श्रद्धाजंली वाहिली जाते. यामुळे कुणाचा मृत्यू झाला आहे, याची माहिती लोकांपर्यंत पोहचते.
 • अंत्यविधीच्या उपक्रमामध्ये जात-धर्म काहीही मानले जात नाही.
 • गावातील सर्वांनाच मदत करण्याची भावना या मंडळांने जोपासली आहे, काही गरिब कुटूंबांना या उपक्रमाचा आधार मिळाला आहे.
 • तसेच गावकरी संकटात असताना हे मंडळ मदतीसाठी नेहमी धावून आले आहे.
 • या मंडळाने स्थापनेपासून आतापर्यंत गुलाल विरहित मिरवणूक काढली आहे.

पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी या मंडळाकडून ग्रामपंचायतीला लोंखंडी तिरडी दिली आहे.

या मंडळाने गणेशोत्सावर होणाऱ्या सर्व टीकाकारांना लोकांच्या दुःखात मदत करुन उत्तर दिले आहे.

बाहेरुन येणाऱ्या गावातील पाहुण्यांनीही या विधायक उपक्रमाचे कौतुक करुन आपले अभिप्राय दिले आहेत.

नवयुवक गणेश मंडळाचा अशा समाजपयोगी कार्याचा आदर्श घेतल्यास गणेशोत्सवाचा हेतू सफल होईल.

loading...

Top 10 News

राशी भविष्य