Thursday, 17 January 2019

यवतमाळमध्ये फवारणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा, 22 शेतकऱ्यांचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

यवतमाळ जिल्हात कीटकनाशकांची फवारणी करतांना शेतकऱ्यांना विषबाधा होत आहे.

यवतमाळ जिल्हात सध्या 6 शेतकरी मृत्युशी झुंज देत आहे. 

जुलै महिन्यापासून 123 शेतकऱ्यांना विष बाधा झाली आहे, त्यापैकी 23 शेतकऱ्यांवर यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

शेतकऱ्यांना होणाऱ्या या विषबाधेमुळे आरोग्य यंत्रणा हादरुन गेली आहे.

प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांना विष फवारणी दरम्यान विशेष खबरदारीचे आवाहन करत आहे.

गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात 900 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फवारणी दरम्यान विष बाधा झाली होती तर 22 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता .

या घटनेमुळे प्रशासन हादरून गेले होते या वर्षीही अशी परिस्थितीत उदभवू नये यासाठी सुरुवाती पासूनच खबरदारी घेण्यात आली होती.

मात्र तरीही या वर्षी आतापर्यंत 123 शेतकऱ्यांना फवारणी दरम्यान विष बाधा झाली आहे.

फवारणी दरम्यान शेतकऱ्याने विशेष काळजी घ्यावी, तसेच अनेक प्रकारची कीटक नाशकांचे मिश्रण तयार करू नये, तसेच फवारणी करताना किटचा वापर न करणे अतिशय धोकादायक आहे .

त्यामुळे शेतकऱ्याने काळजीपूर्वक प्रमाणापेक्षा जास्त फवारणी करू नये, असे आवाहन डीनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य