Tuesday, 22 January 2019

बहिणीचं आयुष्य घडवण्यासाठी भावाने घेतले कष्ट मात्र घडले काही वेगळंच

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

व्याजाने पैशे काढून बहिणीला नर्सिंग प्रशिक्षण व पुढे नोकरी या आशेने पैसे भरलेल्या भावाची दलालांकडून झालेली फसवणूक व पुढे पोलिसांनी पोलिसांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक यामुळे दुखावलेल्या एका  भावाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे.

ही घटना  नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुपती नगर मधली आहे, 18 वर्षीय अनंता प्रधान याने आपल्या बहिणीच्या नर्सिंग प्रवेशासाठी 10 टक्के व्याजाने 48 हजार काढले होते.

अनंताने आपल्या बहिणीच्या नर्सिंग प्रवेश व नोकरीकरिता सुनील भोकरे याला पैसे दिले होते, मात्र व्यवहार झाल्यानंतर सुनील भोकरे याने हात वर केला.

त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन अनंता प्रधान आपल्या बहिणीला घेऊन वाडी पोलीस ठाण्यात गेला होता.

पण पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता अदखल पात्र गुन्हा नोंदवत अनंताला घराचा रस्ता दाखवला. याच वैफल्यातून अनंताने गळफास लावून आत्महत्या केली.

पोलीस सध्या याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत, मात्र या घटनेने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य