Wednesday, 16 January 2019

मनसेचा वाईल्ड क्राफ्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांना चोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सांताक्रुझ पश्चिम इथल्या वाईल्ड क्राफ्ट या बॅग बनवणाऱ्या कंपनीने कामगारांना अचानक पर्मनंट वरून कॉन्ट्रक्ट बेसिसवर आणले.

कंपनी च्या मॅनेजमेंटने हे काम बेकायदेशीर पद्धतीने केल्याने याबाबत कंत्राटी करणाचा जाब विचारला असता. या कंपनीच्या मॅनेजमेंटने अरेरावीच्या भाषेत उत्तर दिल्याने मनसैनिकांनी या वाईल्ड क्राफ्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच चोप दिला आहे.

यामुळे जवळपास पन्नास कामगारावर बेरोजगार होण्याची वेळ येणार होती. त्यामुळे कंपनीने मनसैनिकानी केलेली कृती योग्य असल्याच मनसे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कामगारांनी मनसे कामगार सेनेच्या मदतीने तिथे युनियन तयार केली होती. मनसेने युनियचा लावलेला बोर्ड वाईल्ड क्राफ्ट मॅनेजमेंटने फाडला. त्याचा जाब विचारण्यासाठी कामगार सेना प्रतिनीधी कंपनीच्या कार्यालयात गेले होते.

तिथे त्यांनी युनियनचा बोर्ड पुन्हा लावला आणि बोर्ड ज्यांनी हा फाडला होता त्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिल्याच मनसे युनियनचे पदाधिकारी योगेश चिले यांनी सांगितले.

या प्रकरणाबाबत सांताक्रूझ पोलिसांनी 4 कार्यकत्यांना अटक केली आहे. राकेश जाधव, रमेश राणे, सिद्धेश नेमण, मयुर कदम यांना आता वांद्रे कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य