Saturday, 17 November 2018

अकोला मध्ये ऐतिहासिक परंपरा व अनोखा कावड उत्सव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अकोल्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेला ऐतिहासिक कावड उत्सव व पालखी सोहळा भारतातून फक्त अकोला जिल्ह्यात हा उत्सव साजरा केला जातो.

अकोला शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या राज राजेश्वर मंदिरात तब्बल 20 किलोमीटरवरून गावच्या स्वरूपाने पाणी आणून शिवभक्त जल राज राजेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीवर टाकतात कावड वर हजारो भरणे पाण्यासह बांधलेली असतात, व शिवभक्त ती हजारो भरणी एकाचवेळी खांद्यावर उचलून तबबल 20 किलोमीटर प्रवास करतात.

हा उत्सव देशात केवळ अकोला जिल्ह्यात साजरा होत असून याला ऐतिहासिक परंपरा आहे यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच या कावड उत्सवात महिला मंडळ सहभागी झाल्या असून महिलाही कावडद्वारे पाणी आणून महादेवाला अर्पण करणार आहेत.

यावर्षी सर्वात मोठी कावड तब्बल 1214 भरण्याची असून या कावड महोत्सवात जिल्ह्यातील प्रत्येक जण सहभागी होतो.

हा कावड उत्सव मोठा असतो त्यामुळे संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग दिवसभरासाठी बंद ठेवले जातात.

तसेच यावर्षी या कावड उत्सवात 140 कावडधारी मंडळ सहभागी होत असून प्रत्येक मंडळात हजारो तरुण व युवक असतात मात्र यावेळी पहिल्यांदाच या कावड उत्सवात महिला मंडळ सहभागी होत आहेत. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य