Sunday, 20 January 2019

गुहागरमधील साखळी गोविंदाची एक अनोखी परंपरा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

रत्नागिरीतल्या गुहागरमधील जानवळे गावात गोविंदाची एक अनोखी परंपरा गेली वर्षानुवर्षे सुरू आहे. गुहागरमधील जानवळे गावातला गोविंदा एका वेगळ्या परंपरेमुळे प्रसिद्ध आहे.

गावच्या सहणेच्या ठिकाणी वाडीतले सर्व ग्रामस्थ एकत्र जमून एक साखळी तयार करतात आणि ही साखळी अतूटपणे वाडीवस्तीत एक ताल धरत प्रत्येक घर घेते. प्रत्येक घराच्या अंगणात गोल रिंगण करून नाचत अंगावर पाणी, दही, ताक घेत पुढे निघून जातात.

ही साखळी गोविंदाची परंपरा पूर्वीपासून सुरू असून आजही इथले तरुण ही प्रथा अखंडीतपणे पुढे चालवत आहेत. विशेष म्हणजे अगदी लहान बालकांपासून जेष्ठ ग्रामस्थ या परंपरेत सहभागी होतात. 

गोविंदाच्या सुरक्षेसाठी इथले सर्व नागरिक यामध्ये सहभाग घेत तरुणांच मनोधैर्य वाढवत असतात. येथील गोविंदा साधारणपणे 40 ते 50 हंडी फोडुन नदीवर एकत्रित अंघोळ करून सहाणेवर पुन्हा एकत्र येतात आणि जमलेला सर्व प्रसाद सर्वांना वाटून गोविंदाचा समारोप करतात.

हा प्रसिद्ध साखळी गोविंदा पाहण्यासाठी अनेक भागातून नागरिक जानवळेमध्ये आवर्जून येतात. 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य