Tuesday, 22 January 2019

देशभरात गोकुळाष्टमीचा उत्साह, मुंबईत दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

गोकुळ अष्टमी म्हणजे कृष्ण जन्माचा दिवस,जन्माष्टमी.याच दिवशी म्हणजेच श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो.श्रीकृष्ण जन्माष्टमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.

कृष्णाच्या जन्माचा हा दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करुन कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते. एखाद्या लहान बाळाप्रमाणे कृष्णमूर्तीला आंघोळ घालून त्याच्यासमोर भक्तीगीते म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.  अनेक ठिकाणी रात्री १२ वजता हा कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. मथुरेत दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची अलोट गर्दी आहे. या उत्सवाच्या दिवशी काल्याचा प्रसाद तयार केला जातो. सर्वांना नैवैद्य म्हणून दही, पोहे, काकडी यांचा एकत्र काला दिला जातो. लोणी आणि साखरेचा प्रसाद एकत्र करून कृष्णाला दिला जातो.

गोकुळाष्टमी दिवशी महाराष्ट्रात राज्यात विशेषतः मुंबईत, उंच मातीच्या मडक्यामध्ये दही व दुध भरून उंच दोरीने बांधले जाते. तिथपर्यंत मानवी मनोरा तयार करून मडक्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा केल्या जातात.जो मडक्यापर्यंत पोहोचला तो त्या मडक्याला नारळाने फोडून दहीहंडी स्पर्धा जिंकतो.‘गोविंदा’ हा एकदम साहसी खेळ होतो.

आज मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गोविंदा आता सज्ज झालेत ते दहीहंडी फोडण्यासाठी...कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते.

गिरगावमधील इस्कॉन मंदिरात रविवारी मोठया उत्साहात कृष्णाजन्माष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्याने भाविकांनी गर्दी केली होती. मुंबईमधूनच नाही तर परदेशामधूनही भाविकांनी मंदिरात हजेरी लावली होती. 'हरे कृष्णा, हरे राम'च्या भजनात भाविक तल्लीन झाले होते. रात्री ठीक 12 वाजता शंख वाजवून कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन याठिकाणी करण्यात आले आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य