Sunday, 18 November 2018

स्क्रब टायफसचा धुमाकूळ, बाळंतीण महिलेचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

स्क्रब टायफ़ासचा विदर्भात गेल्या काही दिवसांपासून धूमाकूळ सुरु असून याचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. या आजाराने आणखी एकाचा बळी घेतल्याने मृतांचा आकडा आता दहावर पोहोचला आहे.

उपचारादरम्यान दगावलेली महिला ही ओली बाळंतीण होती. गेल्या गुरुवारी २८ ऑगस्टलाच तिला स्क्रब टायफसची लागण झाल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून तिच्यावर मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

अस्मिता गजभिये असे स्क्रब टायफसने दगावलेल्या तरुण बाळंतिणीचे नाव आहे. अस्मिता या नांदा येथील रहिवासी होत्या. गुरुवारी, २८ ऑगस्टला त्यांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मेडिकलमध्ये येण्यापूर्वीच अस्मिता यांना स्क्रब टायफसचे निदान झाल्याने त्यांच्यावर पूर्वी खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

स्क्रब टायफसपासून सावधान! नागपूरमध्ये आणखी 2 बळी

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य