Thursday, 17 January 2019

कुलाब्यातून बेपत्ता झालेल्या पाचही मुली सापडल्या...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

कुलाब्यातून शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर घरी न परतलेल्या पाचही विद्यार्थिनी कुर्ला स्थानकात सापडल्या आहेत.

एका कफ परेडच्या पोलीस कॉन्स्टेबल आणि त्यांच्या नातेवाईकाला भटकत असलेल्या मुली दिसल्या होत्या. ह्याच आधारावर पोलिसांनी या बेपत्ता मुलांना शोधून काढलंय, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली आहे.

ह्या मुलींनी टॅक्सी आणि रेल्वेनं प्रवास करत शाळेतून सुटल्यानंतर मरिन लाइन्स ते हँगिंग गार्डन त्यानंतर दादर ते ठाणे आणि ठाणे ते दादर असा प्रवास केल्याचं तपासात उघड झालं आहे.

आठवीत शिकणाऱ्या या पाच विद्यार्थिनींचा ओपन-डे म्हणजे परीक्षेचा निकाल होता. या विद्यार्थिनींना परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्या नाराज होत्या. तसंच कमी गुण मिळाल्यामुळे पालकांकडून बोलणी खावी लागतील या भीतीपोटी शाळा सुटल्यानंतर त्यांनी घरी न जाण्याचा निर्णय घेतला. शाळेतून सुटलेल्या मुली घरी न परतल्याने धास्तावलेल्या पालकांनी कुलाबा पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. दरम्यान कप परेडच्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून या विद्यार्थिनी कुर्ला रेल्वे स्थानकात सापडल्यात.

कुलाबा येथील शाळेमधील 5 अल्पवयीन मुली बेपत्ता

loading...

Top 10 News

राशी भविष्य