Friday, 18 January 2019

रिझर्व्ह बँक म्हणजे झिंगलेलं माकड, सामनामधून उद्धव ठाकरेंचा हल्ला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नोटबंदीवरुन सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिझर्व्ह बँकेवर विरोधकांनी सडकून टीका केली असताना आता शिवसेनेनंही नोटबंदीवरुन जोरदार हल्ला केला आहे.

सामनामधल्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. रिझर्व्ह बँक ही देशाच्या अर्थव्यवस्थेची संरक्षक असते. विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झाले आहे.

त्या माकडाने देशाच्या अर्थव्यवस्थेलाच आग लावली. ‘नोटाबंदी’ हा अघोरी प्रयोग होता आणि त्यामुळे देशाचे सव्वादोन लाख कोटींचे नुकसान झाले.

हा भ्रष्टाचार आहे. देशाच्या तिजोरीची लूट आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी ही लूट रोखली नाही म्हणून त्यांना न्यायालयासमोर उभे केले पाहिजे.

सपशेल फसलेल्या नोटाबंदीने देशाला आर्थिक अराजकात ढकलले. त्यामुळे देशाला दिलेल्या वचनास जागून पंतप्रधान मोदी हे आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? असा सवालही विचारण्यात आला आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेतील तब्बल 99.30 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्याचं रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं आहे.

त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय फसल्याची देशभरात चर्चा आहे. हीच संधी साधून उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारबरोबरच नोटाबंदीच्या निर्णयात त्यांना सहकार्य करणाऱ्या रिझर्व्ह बँकेवर जोरदार टीका केली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य