Wednesday, 16 January 2019

'त्या' 5 जणांविरुद्ध माओवाद्यांशी संबंध असल्याचे सबळ पुरावे, पुणे आयुक्तांचा दावा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या 5 जणांविरुद्धात सबळ पुरावे असल्याचा दावा पुण्याचे आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी केला आहे.

बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध, माओवाद्यांशी संभाषण, जंगलामध्ये मनुष्यबळ जमवणे यांसह शस्त्र खरेदी आणि पैसा जमवणे याबाबतचे सर्व पुरावे पुणे पोलिसांकडे आहेत.

नजरकैदेत असलेल्या संशयित 5 शहरी माओवाद्यांविरोधात हे सर्व भक्कम पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केले जातील, असे पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

तसेच या प्रकरणी आणखीही कारवाई होऊ शकते असं सांगत आणखी काहींच्या अटकेचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

‘एल्गार’ परिषदेतील आयोजनात नक्षलवाद्यांकडून झालेला आर्थिक पुरवठा आणि त्यांच्या सहभागाबद्दल पुणे पोलिसांनी धडक कारवाई केली.

त्यामध्ये जून महिन्यात 5 जणांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर 2 दिवसांपूर्वी आणखी 5 जणांना ताब्यात घेतले होते.

सर्वोच्च न्यायालयाने तेलगू कवी वरवरा राव, एडव्होकेट सुधा भारद्वाज, अरुण परेरा, गौतम नवलखा, व्हरनॉन गोन्साल्वीस या 5 जणांना अटक न करता, त्यांच्या घरातच नजरकैद करण्याचा आदेश पुणे पोलिसांना दिला.

आता यावर 6 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर पुणे पोलिसांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य