Sunday, 18 November 2018

आंबेनळी बस दुर्घटनेपुर्वीचा व्हिडीओ 'जय महाराष्ट्र'च्या हाती...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
आंबेनळी घाटात बस दुर्घटनेप्रकरणी एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावरून दापोलीत एकच संशयकल्लोळ उडाला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी तर प्रकाश सावंत यांच्या विऱोधात कृषी विद्यापीठावर मोर्चा काढला होता, तर दुसरीकडे दापोली विद्यापीठाने आपला चौकशी अहवाल सादर केला. 
 
या अहवालात प्रकाश सावंत देसाई यांना क्लिन चिट देण्यात आली. पण अपघातापूर्वी दोन व्यक्ती गाडी चालवत होत्या असंही नमूद केलंय.
 
दरम्यान, याच घटनेचा पुरावा देणारा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ घाटातून जाणाऱ्या दुसऱ्या पर्यटकांनी शूट केलेला आहे. अपघात झालेली बस आधी घाटात उभी असलेली दिसत असून, त्यात चालक गाडीतून खाली उतरत असतानाही दिसत आहे. या अपघातातून प्रकाश सावंत हे एकमेव जिवंत वाचले होते. ते वाचले कसे त्याबाबत संशय व्यक्त केला जात होता

मृतांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेले प्रश्न?

  • एकटे प्रकाश सावंत देसाईचं कसे काय वाचले?
  • ते एकटेच कसे काय बसच्या बाहेर फेकले गेले?
  • ते नेमके कुठे बसले होते?
  • शेवाळलेल्या कातळावरुन प्रकाश सावंत देसाई कसे काय वर आले?
  • प्रकाश सावंत यांनी पोलिसांना आणि प्रसार माध्यमांना वेगवेगळी माहिती का दिली?
 
loading...

Top 10 News

राशी भविष्य