Wednesday, 16 January 2019

शासनाच्या निर्णयाविरोधात आडत व्यापाऱ्यांचा बंद...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

शासनाने आडत दुकानदारांना मुंग हमीभाव पेक्षा कमी दराने खरेदी करू नये यासाठी परिपत्रक काढलं आहे. आडत व्यापाऱ्यांनी जर हमीभाव पेक्षा कमी दराने खरेदी केले तर संबंधित दुकानदाराला पन्नास हजार दंड आणि एका वर्षाची कैद असा आदेश काढला.

शेतीमालाची आवकदेखील घटली असून, आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आता तीन सप्टेंबरला पुण्यात व्यापाऱ्यांनी राज्यव्यापी परिषद बोलावली आहे.

शासनाच्या या निर्णयाविरोधात आज राज्यभर आडत व्यापारी बंद पाळतायेत. परभणीत जिल्ह्यातही आडत व्यपाऱ्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली. आडत व्यापाऱ्यांना हमीभाव खरेदी परवडत नसल्याने व्यापाऱ्यांनी मोंढा बंदची हाक दिली आहे.

एकतर शासन हमीभाव केंद सुरू करत नाही, दुसरीकडे आडत व्यापाऱ्यांच्या बंदमुळे आठ दिवसांवर येऊन ठेपलेला पोळा हा शेतकऱ्यांसाठी जड जाणार हे मात्र नक्की...

आडत म्हणजे काय? 

  • बाजारसमितीमध्ये शेतक-यांकडून आडतदारांकडे माल आणला जातो. 
  • या मालाची विक्री झाल्यावर शेतक-यांच्या पट्टीतून आडत कपात केली जाते. 
  • पणन संचालकांनी या पद्धतीमध्ये बदल केला होता. 
  • नवीन पद्धतीनुसार आडतदारांनी शेतक-यांकडून आडत कपात न करता खरेदीदारांकडून एक टक्के आडत कपात करावी असा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता. 
  • या निर्णयामुळे शेतक-यांचे हित झाले असते. तर यामुळे बाजारसमित्यांमध्ये व्यापार करणे अशक्य होईल असे व्यापा-यांचे म्हणणे आहे. 
loading...

Top 10 News

राशी भविष्य