Friday, 16 November 2018

कोल्हापुरात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमलात, 19 जणांचं नगरसेवक पद रद्द

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, कोल्हापुर

कोल्हापुरात सर्वपक्षीय 19 नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाकडून चांगलाच दणका मिळाला आहे. या 19 नगरसेवकांचं पद जातप्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाबाबत अखेर रद्द करण्यात आलं आहे.

यामध्ये 19 नगरसेवकांना कामकाजात सहभागी होता येणार नसल्याचं आयुक्तांनी स्पष्टीकरण दिल आहे.

या 19 नगरसेवकांमध्ये काँग्रेसच्या 7, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4, भाजपच्या 7 तर शिवसेनेचा 1 नगरसेवकांचा समावेश आहे.

जातप्रमाणपत्र पडताळणीस विलंब झाल्याने उच्च न्यायालयाने हा दणका दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आता सरकार या नगरसेवकांना दिलासा देणार का? याकडेचं सर्वांच लक्ष आहे.

 

या नगरसेवकांचं पद रद्द :

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

 • सुभाष बुचडे (काँग्रेस)
 • स्वाती येवलुजे(काँग्रेस)
 • रिना कांबळे(काँग्रेस)
 • शमा मुल्ला (राष्ट्रवादी काँग्रेस)
 • हसीना फरास (राष्ट्रवादी काँग्रेस)
 • अफजल पिरजादे (राष्ट्रवादी काँग्रेस)
 • संदिप नेजदार(काँग्रेस)
 • वृषाली कदम(काँग्रेस)
 • अश्विनी रामाणे(काँग्रेस)
 • दिपा मगदूम(काँग्रेस)
 • सचिन पाटील(राष्ट्रवादी काँग्रेस)

भाजप-ताराराणी आघाडी

 • कमलाकर भोपळे
 • किरण शिराळे
 • अश्विनी बारामते
 • सविता घोरपडे
 • विजयसिंह खाडे-पाटील
 • मनीषा कुंभार
 • संतोष गायकवाड

शिवसेना

 • नियाज खान
loading...

Top 10 News

राशी भविष्य