Wednesday, 21 November 2018

नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 99.30 टक्के नोटा रिझर्व्ह बँककडे परत जमा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या 99.30 टक्के नोटा रिझर्व्ह बँककडे जमा झालेल्या आहेत.

त्यामुळे नोटबंदीच्या निर्णयाचा नेमका काय फायदा झाला हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

महत्वाचं म्हणजे परत आलेल्या चलनांची किमंत 15.30 लाख रुपये एवढी आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता नोटा मोजण्याचं काम संपल्याचं रिझर्व बँकेने अधिकृतरीत्या जाहिर केलं आहे.

सध्या एकूण चलनात असलेल्या नोटांचा मूल्य 18 लाख कोटी रुपये एवढा आहे, म्हणजे सध्याच्या चलनात 500 व 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा तब्बल 72.7 टक्के उपलब्ध आहे.

देशातील काळा पैसा संपुष्टात यावा, तसेच दहशतवाद्यांची आर्थिक रसद बंद व्हावी, डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ व्हावी व रोखीचे प्रमाण कमी करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली आहे.

नोटाबंदीनंतर 99.30 टक्के नोटा बँकेत परत

  • नोटाबंदीच्या निर्णय़ावर प्रश्नचिन्ह कायम
  • चलनातून बाद झालेल्या 99.30 टक्के नोटा रिझर्व्ह बँककडे जमा
  • एकुण 15.30 लाख कोटी रुपयांच्या नोटा परत
  • या नोटांच्या तपासणी व नोंदणीच काम संपल्याचं रिझर्व बँकेने अधिकृतरीत्या जाहिर केलं
loading...

Top 10 News

राशी भविष्य