Wednesday, 16 January 2019

एकनाथ खडसेंना उच्च न्यायालयाचा धक्का

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाचा धक्का बसला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे.

तसेच हा गुन्हा रद्द व्हावा, अशी विनंती करणारी याचिका दमानिया यांनी दाखल केली होती.

खडसेंविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून फसवणुकीबाबत कट रचल्याप्रकरणी अंजली दमानियांसह 6 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

महिनाभरापूर्वी तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने खडसेंनी न्यायालयात धाव घेतली होती.

मुक्ताईनगर येथील न्यायालयाने 24 तासांत प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य