Sunday, 18 November 2018

जालन्याचे माजी नगरसेवक खुशालसिंह ठाकूर यांची एटीएस आजही करणार चौकशी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचे धागेदोरे आता जालन्यापर्यंत पोहोचले आहेत, आणि यात आणखी एका माजी नगरसेवकाचं नाव समोर आलं आहे.

जालन्याचे माजी नगरसेवक खुशालसिंह राणा ठाकूर यांच्या रेवगाव शिवारातील फार्म हाऊसवर संशयितांनी बॉम्ब बनवून पिस्तूल चालवण्याचा सराव केल्याची कबुली 17 ऑगस्ट रोजी एटीएसने अटक केलेल्या माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरने दिल्यानंतर एटीएसने ही कारवाई केली आहे.

आता याप्रकरणी फार्महाऊसचे मालक खुशालसिंह राणा ठाकूर यांची चौकशी सुरू झाली आहे.

सोमवारी एटीएसनं खुशालसिंह यांना चौकशीसाठी बोलावलं होतं, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

याप्रकरणाशी यांचा काही संबंध आहे का याबाबत माहिती मिळवण्याकरिता त्यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य