Wednesday, 16 January 2019

नागपूरात स्क्रब टायफस आजाराचं संकट, 5 जणांचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, नागपूर

एकीकडे पुण्यामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे तर विदर्भामध्ये 'स्क्रब टायफस' या आजाराचं संकट ओढावलं आहे. या आजारामुळे नागपुरात आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शेतात काम करताना, गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करताना ‘ट्रॉम्बिक्युलिड माइट’ म्हणजे कीडे चावल्यामुळे काही जंतू पसरतात. हे कीडे माणसांना चावतात सुरुवातीला हे कळत नाही पण 10 ते 12 दिवसांनंतर त्याचा प्रभाव दिसायला लागतो.

हे कीडे चावल्यानंतर तिथे व्रण उठतात आणि ‘स्क्रब टायफस’ झाल्याचं समजतं धक्कादायक म्हणजे विदर्भात या आजाराचं वादळ घोंगावतंय आणि आत्तापर्यंत यामध्ये 5 रुग्णांचा बळी गेला आहे.

कसा पसरतो हा आजार

  • शेतात काम करताना, गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करताना ट्रॉम्बिक्युलिड माइट अर्थात चिगर चावल्यामुळे काही जंतू पसरतात.
  • हे चिगर माइट उंदरांना चावतात आणि पुढे या आजाराचा प्रसार होतो.
  • या चिगरमध्ये लहान आणि मोठे माइट असतात. मोठे माइट चावत नाहीत, ते जमिनीवरच असतात.
  • चिगर लारव्हे अतिशय सूक्ष्म असतात, ते डोळ्यांना दिसत नाहीत, त्यांनी चावा घेतल्याने दुखत नाही.
  • यानंतर 10 ते 20 दिवसांनी या स्क्रब टायफसची लक्षणे दिसू लागतात.
  • सुरूवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणं, मळमळ, उलट्या होणं मलेरिया डेंगू या आजाराप्रमाणेचं 'स्क्रब टायफस' आजाराची लक्षणे आहेत.
  • या आजारावर सध्या कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही
loading...

Top 10 News

राशी भविष्य