Wednesday, 16 January 2019

आर. के स्टुडियो लवकरचं होणार इतिहासजमा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचं सोनेरी पान ठरलेल्या आर. के. स्टुडिओच्या आता फक्त आठवणी उरणार आहेत.

कारण कपूर कुटुंबीयांनी अनेक अजरामर चित्रपटांची निर्मिती करणारा हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती मिळत आहे.

स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न तुलनेने कमी असून त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्च जास्त असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

ऋषी कपूर यांनी या बातमीला दुजोरा दिला असून आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचे आणि त्यात संग्रहीत केलेल्या स्मृतींचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे हा स्टुडिओ पुन्हा उभा करणे शक्य नाही.

आता हा स्टुडिओ विकणं योग्य ठरेल असा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शो मॅन राज कपूर यांनी 1948 मध्ये या स्टुडिओची स्थापना केली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य