Wednesday, 21 November 2018

मराठी नाट्यसृष्टीसाठी खूशखबर, आता मराठी नाटकांची फोर्ब्जकडून दखल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

मराठी नाट्यसृष्टीसाठी एक खुशखबर आहे. आता मराठी नाटकांची दखल फोर्ब्ज या जगप्रसिद्ध मासिकेकडून घेण्यात आली आहे. विठ्ठलाच्या भक्तीने देहभान हरपलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पत्नी अवली आणि विठ्ठलाची सहचारिणी रुक्मिणी यांच्यामधला भावपूर्ण संवाद रसिकांसमोर मांडणाऱ्या संगीत देवबाभळी या नाटकामुळे मराठी नाट्यभूमीची एक वेगळीचं ओळख निर्माण झाली आहे.

तरुण नाटककार प्राजक्ता देशमुख लिखित आणि दिगदर्शिक देवबाभळी या नाटकानं काही महिन्यातंच रिसकांची मन जिंकली आहेत.

या नाटकाची लोकप्रियता आणि विषयाचे सादरीकरण लक्षात घेऊन फोर्ब्जच्या मासिकाने जागतिक नाट्यकलेवर आधारित असलेल्या लेखामध्ये देवबाभळीची दखल घेतली आहे.

तसेच निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'अमर फोटो स्टुडिओ', 'इंदिरा', 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला', आणि 'वाडा चिरेबंदी' या नाटकांचेही 'फोर्ब्ज'द्वारे कौतुक करण्यात आले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य