Wednesday, 21 November 2018

पूर्व-विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

पूर्व-भारतात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व-विदर्भात आज आणि उद्या पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

यामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आह, ज्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटू शकतो.

म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. या दरम्यान नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावं असं आवाहन कृषी विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य