Sunday, 20 January 2019

सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत वाढ, यासंदर्भात होणार चोकशी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरेला 30 ऑगस्टपर्यत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. शरद कळसकर याची पोलीस कोठडी लवकरच संपत आहे. सीबीआयला तपासासाठी ताब्यात घ्यायचे आहे. त्यावेळी सचिन अंदुरेची उपस्थिती आवश्यक आहे. दोघांची एकत्रित चौकशी करायची आहे. त्यासाठी त्यासाठी सचिन अंदुरेची सीबीआय कोठडी आवश्यक आहे. सीबीआय दाभोळकर खुन प्रकरणात शरद कळसकरला अटक करणार आहे. सीबीआय वकीलांची कोर्टात माहीती दिली.
कळसकरची एटीएस कडील पोलीस कोठडी 28 ऑगस्टला संपत आहे.त्यानंतर सीबीआय कळसकरला अटक करणार आहे.अंधुरेच्या मेहुण्याकडून ब्लॅक कलर पिस्टल जप्त करण्यात आलय. गौरी लंकेश खून प्रकरणात वापरण्यात आलेले हे पिस्टल आहे. त्यासंदर्भात अधिक तपास करायचा आहे असं सीबीआय वकीलांनी सांगितले आहे. तर सीबीआय कोठडी गरज नाही न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अस आरोपी वकीलांनी सांगितले आहे.
सीबीआय कोठडी दरम्यान दाभोळकर हत्येप्रकरणी काहीच तपास झालेला नाही. तपास झाला असेल तर त्याचा प्रोगरेस रिपोर्ट सीबीआय ने सादर करावा.त्यामुळे सीबीआय कोठडी न देता न्यायालयीन कोठडीत देण्यात यावी. सीबीआय दोन प्रकारच्या थेअरी मांडते आहे. वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर सीबीआयने सविस्तर माहिती चार्जशीट दाखल केले आहे. त्यात सारंग अकोलकर आणि विनय पवार मारेकरी असल्याचं म्हटलंय.
आता, अंदुरे आणि कळसकर मारेकरी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. त्यामुळे सीबीआय ची कोणती थेअरी खरी मानायची? सीबीआयने अकोलकर आणि पवार मारेकरी नसल्याचं मान्य करावं. किंवा ते चार्जशीट चुकीचं होतं हे मान्य करावं असं मत आरोपीच्या वकिलांनी सांगितले आहे.त्यामुळे तपासासाठी सचिन अंधुरे याला सीबीआय कोठडीत ३० ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य