Wednesday, 16 January 2019

मोदी प्रधानमंत्री नसून प्रचार मंत्री आहेत - कन्हैया कुमार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या काळात मागासवर्गीयांसाठी काहीही केलं नसल्याची टीका कन्हैया कुमार यांनी केली आहे. विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांची नांदेडमध्ये सभा झाली. या सभेला प्रचंड अशी गर्दी जमली होती. या सभेत कन्हैया यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

प्रधानमंत्री मोदी स्वतः मागासवर्गीय असल्याचे सांगतात मात्र त्यांनी देशातील मागास घटकासाठी काहीही केलं नसल्याची टीका कन्हैयानी केली आहे. 

मोदी म्हणतात की मी मागासलेला आहे, तर मोदींनी सांग़ावं की या चार वर्षात मागासवर्गींसाठी काय केलं? किती विद्यापीठ,हॉस्पिटल काढलेत? चार वर्षांपासून मागासवर्ग़ीय विद्यार्थ्यांना फ़ेलोशिप भेटली नाही, असे प्रश्न कन्हैया यांनी मोदींना केलेत. नांदेड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

कन्हैया कुमार यांचं भाषण - 

  • एटीएम च्या लाईन ला आई ला उभा करणारा पंतप्रधान
  • चहा विकणारा एक फोटो दाखवा
  • झाडू करतानाचा फोटो नकली आहे
  • चार वर्षात मोदीने दलितांना काय दिले.?
  • दलितांच्या कल्यानेवजी अंबानी अदाणीचे कल्याण करत सुटले.
  • मोदी मार्केटिंगमध्ये उस्ताद आहेत
  • मोदी प्रधानमंत्री नसून प्रचारमंत्री आहेत
loading...

Top 10 News

राशी भविष्य