Tuesday, 20 November 2018

नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसने शुक्रवारी रात्री घाटकोपरमधून आणखी एकाला अटक केली आहे.

अविनाश पवार असं या संशयित आरोपीचं नाव असून, त्याला शनिवारी कोर्टात हजर केले असता 31 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नालासेपारा स्फोटक प्रकरणातीला हा पाचवा आरोपी आहे.

दरम्यान, या प्रकरणात एटीएसने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि आणखी 3 आरोपींना अटक केली होती.

अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचा सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या संघटनांशी संबंध असल्याचे म्हंटले जात आहे.

मुंबईसह कोल्हापूर, सोलापूर येथे घातपात करण्‍याचा आरोपींनी कट रचला होता, असा दावाही एटीएसने केला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य