Tuesday, 20 November 2018

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

 

आपलं स्वता:चं एक हक्काचं घर असावं असं घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लॉटरी असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे.

मुंबई मंडळासाठी 900 ते 1000 घरांसाठी ही लॉटरी असल्याची माहितीही मेहता यांनी दिली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळातील सुमारे हजार घरांसाठी येत्या दोन महिन्यात लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलीये. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही लॉटरी काढली जाणार आहे.

मुंबईत आज म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 9 हजार 18 घरांची ऑनलाईन सोडत काढण्यात आली.

म्हाडाच्या वांद्रेमधील मुख्यालयात सकाळी 10 वाजता मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली

loading...

Top 10 News

राशी भविष्य