Wednesday, 16 January 2019

'क्रिस्टल' च्या बिल्डरला पोलीस कोठडी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

परळमधील क्रिस्टल टॉवर इमारतीमध्ये लागलेल्या आगी प्रकरणी अब्दुल रज्जाक सुपारीवाला या बिल्डरला अटक करण्यात आली असुन त्याला 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसंच त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप लावण्यात आला.

भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या बिल्डरला कोर्टात आज हजर करण्यात आले.

काल लागलेल्या या आगीत चौघांचा मृत्यू झाला आहे. तसंच या बिल्डिंगला ओसी नसताना इथं लोकांना फ्लॅटचा ताबा देण्यात आल्याचं उघड झालं. त्यामुळे अग्निशमन दलाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

परळमधल्या आगीच्या कारणांवर 'जय महाराष्ट्र'चे सवाल?

फोटो : क्रिस्टल टॉवरमधील अग्नितांडव

Update : क्रिस्टल टॉवर अग्नितांडव : इमारतीला 'ओसी'च नसल्याचं उघड

फोटो: मुंबई आगीच्या तडाख्यात?

loading...

Top 10 News

राशी भविष्य