Tuesday, 20 November 2018

आता ‘NEET’ची परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली

 

NEET परीक्षा आता वर्षातून एकदाच होणार असून आता नीटची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. अशी घोषणा मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली आहे.

महिन्याभरापूर्वीच मंत्रालयाने 2019 पासून NEET परीक्षा ऑनलाइन पद्धतीने वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला आहे.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी NEET परीक्षा आता वर्षातून एकदाच घेण्यात येणार आहे.

तसेच आता विद्यार्थ्यांना ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणेच नीटची परीक्षा लेखी स्वरुपात द्यावी द्यावी लागणार आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यापूर्वी वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनंतर हा निर्णय मागे घेण्यात अला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य