Sunday, 20 January 2019

सनातन बंदीसाठी राज्य सरकार सकारात्मक - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

हिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेक दहशतवादी कारवायांत सनातन संस्थेच्या साधकांची नावं पुढे आली आहेत. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी केली.

गेल्या काही दिवसात राज्यातील विचारवंतांच्या हत्यांमागे सनातन संस्थेचे साधक असल्याचा आरोप होतो आहे. यानंतर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून केली जातेय. त्यावर आता सरकारनंही सनातनवर बंदीसाठी सकारात्मक भूमिका घेतलीये.

गेल्या आघाडी सरकारनं सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर मोदी सरकारनं पाठवलेल्या शंका आणि आक्षेपांची पूर्तता राज्य सरकारनं केली आहे. सनातन बंदीसाठी राज्य सरकार सकारात्मक आहे अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जय महाराष्ट्रच्या लक्षवेधी कार्यक्रमात दिलीये...

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य