Wednesday, 16 January 2019

डाॅ. दाभोळकर हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद 
 
एटीएसने औरंगाबादहुन आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. शरद कळसकर आणि सचिन अंदुरेकडून मिळालेल्या माहितीवरून चौकशी सुरु आहे.
  • औरंगाबादमधील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु
  • एटीएसकडून सचिन अंदुरेच्या मित्रांची आणि नातेवाईकांची चौकशी
  • तपासातून पिस्तुल आणि मोटार सायकलचा शोध घेण्यास तपास सुरु
  • भाऊ जिथे राहत होता त्या सातारा परिसरात चौकशी

एटीएसने 9 ऑगस्टच्या रात्री आणि 10 ऑगस्टच्या सकाळी नालासोपारा, तसेच पुणे येथे छापे टाकून राऊत याच्यासह कळस्कर आणि गोंधळेकर यांना ताब्यात घेत अटक केली आहे. तिघांकडेही केलेल्या कसून चौकशीत यातील एकाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याची आणि अणदुरे याच्या मदतीनेच ही हत्या घडवून आणल्याची धक्‍कादायक कबुली एटीएसला दिली. याच माहितीच्या आधारे एटीएसच्या एका पथकाने औरंगाबाद येथून अणदुरेला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यानेही या हत्येची कबुली दिली. हा गुन्हा सीबीआयकडे तपासासाठी असल्याने अणदुरेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे.

असा रचला हत्येचा कट - 

नरेंद्र दाभोलकर माॅर्निंग वाॅकला जात असताना त्यांच्या दिशेने बाईक चालवत शरद कळसकर आला आणि त्याच्या मागे बसलेल्या सचिन अंदुरे याने नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या आणि ते दोघे पसार झाले.

त्या कृत्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे या हत्येत वापरलेली बाईक, पिस्तूल आणि कपडे हे नष्ट करण्यासाठी दिले की यांनीच ते नष्ट केले याचा तपास आता एटीएस आणि सीबीआय करत आहेत. पण महत्वाचे म्हणजे या हत्येकरता बाईक आणि पिस्तूल पुरवले कुणी? याचा तपास देखील सीबीआय करत असून याआधी अटक केलेल्या विरेंद्र तावडे याने त्याची बाईक पनवेलहून पुण्याला नेली होती ती हीच बाईक आहे का ? जी शरद आणि सचिनने वापरली होती. 

 
loading...

Top 10 News

राशी भविष्य