Thursday, 15 November 2018

अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तस्स्था, नवी दिल्ली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासात वाजपेयींची प्रकृती गंभीर झाल्याचे एम्सकडून जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्रीचं एम्समध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतली.

त्यानंतर आज सकळपासून अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

मागच्या 2 महिन्यांपासून वाजपेयींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरु असून किडनीच्या त्रासामुळे त्यांना 11 जूनला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य