Wednesday, 23 January 2019

घातपाताचा कट, ATS ची कारवाई...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सनातन संस्थेचा कथित साधक वैभव राऊतच्या मुसक्या आवळल्यानंतर पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर आणि नालासोपाऱ्यातूनतच शरद कळसकर अशा एकूण तिघांना एटीएसने अटक केली आहे. नालासोपाऱ्यातील भांडारआळी येथून वैभव राऊत यास अटक करण्यात आली आहे.

नालासोपाऱ्यामध्ये वैभव राऊतच्या घरातून एटीएसने मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत. राऊतच्या घरातून 20 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आलेत. दोन जिलेटिनच्या कांड्याही जप्त केल्या आहेत. वैभव राऊतने ही स्फोटकं का आणि कशी जमा केली, याचा पोलीस तपास करत आहेत.

 

ATS ने अशी केली कारवाई -

  • एटीएसला ७ ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदाराकडून मुंबईत काही संशयास्पद कारवाई सुरु असल्याची माहिती एटीएसला मिळाली
  • केवळ गुप्त बातमीदाराकडून एटीएसच्या अधिकाऱ्यांना दहशतवादी कारवाया करणाऱ्या संशयास्पद आरोपींचे केवळ मोबाईल क्रमांक मिळाले होते.
  • या मोबाईल क्रमांकाच्या आधारे एटीएसच्या पोलिसांनी २ दिवस गुप्त पळत ठेवत आणि माहिती गोळा केली
  • नालासोपारा येथे छापा टाकत ८ गावठी बॉम्ब आणि इतर घातक सामान हस्तगत केलं.
  • तर पुण्यात शिवप्रतिष्ठान संस्थेच्या सुधन्वा गोंधळेकरला पोलिसांकडून अटक करत २० बॉम्ब आणि ५० हातबॉम्ब बनवण्याचे साहित्यही हस्तगत करण्यात आले.

 

b06503ce-2ff6-4b8d-bbe9-03caa8a85939.jpg

 

cd0e84c0-aa07-43cc-bdcf-62204d812b41.jpg

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य