Tuesday, 20 November 2018

एथलीट हिमाने रचला इतिहास, बॉलीवुड देतयं शुभेच्छा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

असामची 18 वर्षीय हिमा दास हिने इतिहास रचला आहे. हिमाने 12 जुलैला फिनलॅंडच्या टॅम्पॅरेमध्ये अंडर-20 ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्ड मेडल जिंकून देशाचं नाव उंचावलं आहे.

या ऐतिहासिक विजयावर हिमाला अनेक बॉलीवूड स्टार्सने शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयावर हिमाला देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

हिमाला बॉलीवुडमधून अमिताभ बच्चनसह शत्रुघ्न सिन्हा, अक्षय कुमार, फरहान अख्तर यांनी सोशल मीडियाच्यामाध्यमातून या यशाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.  

या ऐतिहासिक यशानंतर हिमा दासने म्हंटले आहे की ‘मी सर्व भारतीयांना धन्यवाद म्हणू इच्छिते आणि इतर सर्वांनाही ज्यांनी मला प्रोत्साहित केले आहे’.

या शर्यतीत भारताचा झेंडा फडकवून मी खुप आनंदी आहे. आणि आता माझं लक्ष्य एशियन गेम्स आहे. पण ओलम्पिक मध्ये जिंकण्याचे माझं स्वप्न आहे.  

loading...

Top 10 News

राशी भविष्य