Sunday, 20 January 2019

डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग यांची ऐतिहासिक भेट...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रम्प’ आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ‘किम जोंग’ यांची ऐतिहासिक भेट सिंगापूरमधील कपॅला हॉटेलमध्ये पार पडली. यादरम्‍यान जगात शांतता प्रस्‍थापित करण्‍याची चर्चा या नेत्‍यांमध्‍ये झाली आहे. या भेटीत दोघांनी सुमारे 50 मिनिटं एकमेकांशी चर्चा केली आहे. ही भेट यशस्वी ठरल्यास एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या या 2 देशांमध्ये मैत्रीची नव्याने सुरुवात होऊ शकते.

त्याचबरोबर जगात शांतता राखण्यासाठी ही भेट खुप महत्वाची आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. या दोन्ही देशांमध्ये जवळपास 70 वर्षांपासून कोणतेही संबंध नव्हते. उत्तर कोरियाच्या अणुचाचणीला अमेरिकाचा असलेला विरोध, आणि त्या पार्श्वभूमीवर या 2 नेत्यांची भेट महत्वपूर्ण ठरणार आहे.

जागतिक शांततेसाठी ही भेट फार महत्त्वाची असल्यानं सिंगापूर सरकार ट्रम्प आणि किम जोंग यांच्या भेटीवर 100 कोटी एवढा खर्च करत आहे. असं सिंगापूरचे पंतप्रधान ‘ली सेन लुंग’ यांनी सांगितलं आहे.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य