Sunday, 20 January 2019

विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप - शिवसेनेचं वर्चस्व

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झालेत. यामध्ये भाजपा व शिवसेना प्रत्येकी २ जागांवर विजयी झाले असून राष्ट्रवादी १ जागेवर निवडून आले आहे. 

अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का मिळाला.कारण अमरावतीत काँग्रेसची स्वत:ची 128 मतं असताना काँग्रेस उमेदवाराला केवळ 17 मतं मिळाली.

 • भाजपा - प्रविण पोटे-पाटील (458 मतं)
 • काँग्रेस - अनिल मधोगरिया (17 मतं)
 • भाजप 441 मतांनी विजयी

दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेनेने बाजी मारली.  पालघरचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या भाजपला हा मोठा दणका आहे.

 • शिवसेना - नरेंद्र दराडे (412 मतं)
 • राष्ट्रवादी - शिवाजी सहाणे (219 मतं)
 • शिवसेना 193 मतांनी विजयी

रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला.

 • राष्ट्रवादी - अनिकेत तटकरे (620 मतं)
 • शिवसेना - राजीव साबळे (306 मतं)
 • राष्ट्रवादी 314 मतांनी विजयी

परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचा विजय

 • शिवसेना - विप्लव बाजोरिया (256 मतं)
 • काँग्रेस - सुरेश देशमुख (221 मतं)
 • शिवसेना 35 मतांनी विजयी

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत कमळ फुललं 

 • भाजपा - रामदास आंबटकर (528 मतं)
 • काँग्रेस - इंद्रकुमार सराफ (491 मतं)
 • भाजप 37 मतांनी विजयी

विधानपरिषदेच्या पाच जागांचा निकाल आज जाहीर झाला असला तरी लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर पडली आहे.

या सर्व मतदारसंघात सोमवारी 21 मे रोजी मतदान झालं होतं.

विधान परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर...

"विधानपरिषदेच्या जागा राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढणार"

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य