Sunday, 20 January 2019

विधान परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 5 जागांसाठी होणारी मतमोजणी आज पार पडली असून विधान परिषदेचे सर्व निकाल अखेर जाहीर झाले आहेत. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे तर अमरावती आणि चंद्रपुरात भाजपानं विजय मिळवला आहे.

कोकणातील जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला असून परभणी-हिंगोलीच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत भाजपाने 2 जागांवर , शिवससेनेने 2 तर राष्ट्रवादीने 1 जागांवर विजयी मिळवला आहे.

अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी 441 मतांनी विजयी मिळवला आहे, तसेच चंद्रपुरात भाजपाचे रामदास आंबटकर यांनी 550 मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ 462 मतं मिळाली आहेत.

नाशिकमध्येही शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी 400 मतांनी विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांना 231 मतं मिळाली आहेत. 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य